व्हीएस न्यूज - मात्र
राजस्थानात आपल्या विधवा आईचे लग्न करून देण्यासाठी मुलीने पुढाकार घेतल्याचे
उदाहरण पुढे आले आहे. विशेष म्हणजे ही मुलगी स्वतःच उपवर आहे.
राजधानी जयपुर येथील या आगळ्यावेगळ्या लग्नाचा निर्णय व त्याचे आयोजन यांची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. संहिता अग्रवाल असे या मुलीचे नाव आहे. संहिताचे वडील मुकेश गुप्ता यांचे वयाच्या 52 व्या वर्षी 13 मे 2016 अचानक मृत्यू झाला होता. त्यामुळे संहिताची आई गीता नैराश्यात गेल्या होत्या. संहिताच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाल्यानंतर घरात केवळ ती व आई हेच राहिले होते. संहिताला नोकरी लागल्यानंतर तिची आई पूर्णपणे एकटी राहिली.
तेव्हा 2016 मध्ये संहिताने एका मॅट्रिमोनियल संकेतस्थळावर आईचे प्रोफाईल बनविले. त्यातून गोपाल गुप्ता या 55 वर्षांच्या महसूल अधिकाऱ्याचा प्रस्ताव त्यांना आला. त्यांच्या पत्नीचा एक वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. एका मोठ्या ऑपरेशननंतर त्यांनी रुग्णालयात सेवा केली. त्यांच्या निस्वार्थ सेवेने प्रभावित होऊन संहिताच्या आईने लग्नासाठी होकार भरला. दोघांनीही आपल्या निवडक नातेवाईकांसमक्ष आर्यसमाज मंदिरात लग्न केले. ‘मी केवळ पुढाकार घेतला आहे. तुम्ही साथ दिली तर आपल्याला या देशातील घरांबाहेर हातात जपमाळ ओढणाऱ्या व कोणीतरी बोलण्याची वाट पाहणारे वृद्ध दिसणार नाहीत. ती असहायता संपवायची आहे,’ असे संहिताने आपल्या फेसबुक वॉलवर लिहिले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002