व्हीएस न्यूज - आपल्या रांगड्या
स्वभावासाठी आणि बेधडक वक्तव्यांसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार
प्रसिद्ध असून पुन्हा एकदा याची प्रचिती बारामतीच्या कार्यक्रमात आली. यावेळी अजित
पवारांनी फेटा फारसा न बांधण्यामागील रहस्य सांगितले आणि उपस्थितांमध्ये एकच हशा
पिकला.
तुम्हाला
माहित आहे कि मी तर कधी फेटा बांधत नाही. पण मलाही तुम्ही फेटा बांधल्यावर राहवले
नाही,
म्हटले बांध बाबा, आता काय करु? कारण फेटा बांधायला आता केस पण राहिले नाहीत की काय, सगळे केस गेले, तुमच्यासाठी काम करता करता माझे केस
पण गेले. मी सुनेत्राला म्हणत असतो आता माझे केस बारामतीकरांकरता गेले, का तुझ्यामुळे गेले बघ आता.
बारामतींसाठी
केलेल्या कामाचा बोजा आणि पत्नीच्या त्रासाशी केस गळतीचा संबंध अजित पवारांनी
जोडला. उपस्थितांची अजित पवारांचे बिनधास्त वक्तव्य ऐकून हसूनहसून पुरेवाट झाली.