व्हीएस न्यूज – तृणनाशक जीनचा समावेश असलेल्या बिजी 3 नावाने वेगवेगळ्या कंपन्या कापूस बियाणांची विक्री राज्यात विनापरवाना करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर तातडीने प्रतिबंध करण्यासाठी राज्यातील बायोटेक्नॉलॉजीस्ट समन्वय समितीची बैठक घेण्याचे आदेश कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज दिले. या बियाण्यांचे सामाजिक, शारिरीक व कृषी क्षेत्रावर होणा-या दुष्परिणामांचा अभ्यास न करता विक्री होत आहे ही गंभीर बाब असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.
देशात बिजी 1 आणि बिजी 2 या प्रमाणित बियाणांच्या विक्रीसाठी केंद्र सरकारने परवानगी दिलेली आहे. मात्र काही कंपन्या वेगवेगळे ब्रॅण्डनेम वापरून तृणनाशक गुणधर्म असलेले बिजी 3 कापसाचे बियाणे परवाना नसताना विक्री करीत आहेत. महाराष्ट्राबरोबरच गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा यासारख्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये अशा प्रकारची विक्री होत आहे.केंद्रीय कापूस संशोधन केंद्राने काही नमुने तपासल्यावर ते पॉझिटिव्ह आढळून आले आहे. याबाबतची माहिती घेऊन अशा विनापरवाना बियाणे विक्रीवर तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी बैठक घ्यावी. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या राज्यस्तरीय बायोटेक्नॉलॉजी समन्वय समितीची बैठक तातडीने आयोजित करावी, असे आदेश कृषिमंत्र्यांनी विभागाच्या प्रधान सचिवांना दिले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002