व्हीएस न्यूज - पतंगाच्या मांज्यामुळे
एका ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्याला दुखापत झाली आहे. ही घटना गुरूवारी सायंकाळी सहा वाजता काळेवाडी येथे
घडली आहे. तीन दिवसापुर्वी नातेवाईकाबरोबर
दुचाकीवरून जाणाऱ्या एका दोन वर्षीय मुलाच्या डोळ्याला मांज्यामुळे गंभीर जखम झाली
होती. त्यामुळे पतंगाचा मांजा जीवघेणा ठरत आहे.
रंगनाथ बाळकृष्ण भुजबळ (रा. ज्योतिबा नगर काळेवाडी), असे जखमी ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. भुजबळ गुरूवारी सायंकाळी काळेवाडीतील तापकीर चौकातून दुचाकीवरून जात होते. अचानक पतंगाचा मांजा त्यांच्या गळ्याला गुंडाळला गेला. मांजा काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला असता हाताच्या अंगठ्यालाही जखम झाली. गळ्यालाही जबर जखम झाली. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी काळेवाडीतच हमजा खान या दोन वर्षाच्या मूलाच्या पतंगाच्या मांज्यामुळे जबर जखम झाली होती. यामध्ये त्याच्या डोळ्याला तब्बल 32 टाके पडले आहेत.
मांजा ठरतोय जीवघेणा …
मकरसंक्रात हा सण उद्या (रविवार) आहे. यानिमित्त शहरातील विविध भागात लहान मुले पतंग उडवत आहेत. या पतंगाचा मांजा नायलॉनच्या धागा असतो. त्यामुळे नागरिकांनाही यापासून मोठी इजा होत आहे. पतंगाचा माजा सर्वाधिकपक्षांसाठी घातक ठरत असून यामुळे अनेक पक्षांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002