व्हीएस न्यूज - समाजात माता जिजाऊ यांचे
कुठेतरी संस्कार हरवत असल्याने आजचा तरुण व्यसनाधीन बनत चालला आहे.म्हणून समाजाला
राजमाता जिजाउंचे संस्कार तर छत्रपती शिवाजी महराजांच्या विचारांची आज गरज आहे,
असे उद्गार शिवव्याख्यात्या
अर्चना भोर- कारंडे यांनी काढले.
स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेत "गरज जिजाऊंच्या संस्काराची- छत्रपतींच्या विचारांची" या विषयावर त्या बोलत होत्या. यावेळी अ प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे, नगरसेविका व माजी महापौर मंगला कदम, माजी नगरसेवक अजय सायकर, उद्योजक संदीप नेवाळे, वास्तुविशारद कवि राजेंद्र कोरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामराजे बेंबडे आदी उपस्थित होते.
भोर पुढे म्हणल्या कि, शिवाजी महाराजांनी वयाच्या 16 व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला. शाहू महाराज 18 व्या वर्षी सिंहासनावर विराजमान झाले. महात्मा फुले यांनी वयाच्या 21 व्या वर्षी शाळा सुरू केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वयाच्या 28 व्या वर्षी संविधान लिहिले. भगतसिंग हे 21 व्या वर्षी हसतमुखाने फासावर गेले. या सर्व युगपुरुषांनी अल्प वयातच कारकिर्द गाजवली. आजचे तरूण 30 ओलांडली तरी आईवडिलांच्या जीवावर बसून खातात. काही उनाडक्या करीत फिरतात. काही तरुण शिवरायांसारखे दिसावे म्हणून दाढी वाढवून, कपाळावर चंद्रकोर लावून स्वतःला मिरवतात. तरुणांनी शिवरायांचा एकतरी विचार आत्मसात केला तरी समाजात परिवर्तन होईल.
महाराष्ट्रात बलात्काराचे प्रमाण वाढले. कारण आपल्या घरातील जिजाऊ संस्कार देण्यात कमी पडत आहे. आज आपण महापुरुषांना जाती धर्मात वाटून घेतलेच. त्याचबरोबर निसर्गाने दिलेले रंग देखील आपण वाटून घेतले. महापुरुषांनी आपल्याला दिले काय? अन् आपण घेतले काय? शिवराज व भिमराय समजले असते तर त्यांनी जातीच्या नावावर दंगली घडून आणल्या नसत्या. सुत्रसंचालन संतोष ठाकुर यांनी तर उल्हास तापकिर यांनी आभार मानले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002