व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड
महापालिकेच्या वतीने राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त
त्यांच्या प्रतिमेस उपमहापौर शैलजा मोरे व स्थायी समिती सभापती सिमा सावळे यांच्या
हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, अ प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे, नगरसेविका अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त प्रविण आष्टीकर, सह आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कामगार कल्याण अधिकारी विजय साबळे, सामाजिक कार्यकर्ते औदुंबर बागडे, माहिती व जनसंपर्कचे किशोर केदारी, रमेश भोसले, आकाश चव्हाण, भरत गायकवाड, जोपा पवार, सुखदेव जाधव, रामदास कटके आदी उपस्थित होते.
दरम्यान, पुनावळे येथील श्रीमती अनुसाई ओव्हाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस नगरसेविका रेखा दर्शले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002