व्हीएस न्यूज – गोवा येथे दि. 20 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या 48 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (ईफ्फी) सहा मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. या चित्रपटांमध्ये झाला बोभाटा, पिंपळ, फिरकी, दशक्रीया, हृदयांतर, बंदुक्या या सहा चित्रपटांचा समावेश आहे.
गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 2015 पासून एनएफडीसीच्या फिल्म बाजारमध्ये मराठी चित्रपट सरकारतर्फे पाठविण्यात येत आहे. या महोत्सवात अनेक राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय निर्माते, दिग्दर्शक, समीक्षकांनी तसेच चित्रपट रसिकांनी हे चित्रपट पाहिले. त्यामुळे मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहचण्यास मदत झाली. महोत्सवाकरिता चित्रपटांच्या परीक्षणासाठी पाच सदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्यामार्फत महोत्सवाकरिता प्राप्त झालेल्या 20 चित्रपटांचे परीक्षण करण्यात आले. या समितीने 6 चित्रपटांची निवड केली.