व्हीएस न्यूज : इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आजपासून भारत दौर्यावर आले आहेत. मोदींसाठी खास गिफ्ट बेंजामिन आणणार आहेत. मोदी गेल्यावर्षी इस्त्राईल दौर्यावर असताना त्यांना मोबाईल वॉटर प्युरिफिकेशन जीप आवडली होती. नेतन्याहू इस्त्राईलमध्ये ओल्गा बीचवर ड्राईव्हही केली होती. हीच मोबाईल वॉटर प्युरिफिकेशन जीप आता मोदींना भेट म्हणून मिळणार आहे.
ही जीप भूकंप, महापूर अशा नैसर्गिक आपत्तीच्या दरम्यान फार महत्त्वाची मदत करणार आहे. ही जीप एका दिवसात २० हजार लीटर समुद्री पाण्यात आणि ८० लीटर दूषित पाण्यात काम करू शकते. भारतात पंजाबमध्ये अनेक दुर्गम भागात पाणी वेळीच पोहचवण्यासाठी या जीपचा फायदा होणार आहे.