व्हीएस न्यूज : आपली प्लेईंग ११ टीम भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने घोषित केली आहे. भारताच्या ३ खेळाडूंना या टीममध्ये जागा मिळाली आहे. शिवाय इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या ३ खेळाडूंना या टीममध्ये जागा दिली गेली आहे. भारताच्या सेहवाग, सचिन आणि युवराजला या संघात धोनीने स्थान दिले आहे.
विराटला माहीच्या या टीम मध्ये जागा मिळाली नाही. धोनी आणि कोहली या दोघांमध्ये क्रिकेटच्या मैदानात चांगले संबंध आहे. पण धोनीने टीममध्ये कोहलीला जागा न देणे हे क्रिकेट चाहत्यांच्या समजण्यापलीकडे आहे.