पाक परराष्ट्रमंत्र्यांची भारतावर अणू हल्ला करण्याची धमकी
नवी दिल्ली :
2018-01-15
व्हीएस न्यूज- भारतावर अणू हल्ला करण्याची धमकी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा मोहम्मद असिफ यांनी दिली. ख्वाजा यांनी भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या वक्तव्यानंतर अणू हल्ल्याची भाषा करत प्रत्युत्तर दिले.
अत्यंत बेजबाबदार वक्तव्य ”भारताचे लष्करप्रमुख रावत यांनी केले, भारताची जर अणू हल्ल्याची इच्छा असेल तर त्यांचे आम्ही स्वागत करतो, असे ते म्हणाले. आम्ही पाकिस्तानच्या ‘न्युक्लिअर ब्ल्फ’ आणि सीमा रेषा पार करण्यासाठी तयार आहोत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैसल यांनी याबाबत टि्वट करून सांगितले, की भारतीय लष्करप्रमुखांकडून करण्यात आलेले वक्तव्य बेजबाबदारपणाचे आहे. आम्ही कोणताही मुद्दा सध्या सौम्यरितीने घेत नाही. कोणतीही अडचण कोणत्याही चुकीच्या आधारावर व्हायला नको. तसेच पाकिस्तान स्वत:चे रक्षण करण्यासाठी स्वत:ला वाचवण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे.