व्हीएस न्यूज - मुंबई उच्च न्यायालयाने बायकोचे टोमणे हे पतीसाठी क्रूर वर्तन आहे, असा निर्वाळा देत ६२ वर्षीय पतीला घटस्फोट मंजूर केला आहे. पतीने लग्नाच्या २३ वर्षांनी घटस्फोटाचा अर्ज केला होता, त्यानंतर न्यायालयाने तब्बल २२ वर्षांनी हा अर्ज मंजूर केला.
संसार म्हटला कि पती-पत्नीमध्ये छोट्या-मोठ्या कुरबुरी रोजच्याच असतात. पण सतत पतीला पत्नीने मारलेले टोमणे हे क्रौर्य असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला. अखेर ६२ वर्षीय पतीला लग्नाच्या ४५ वर्षांनी घटस्फोट मिळाला. त्यांचे लग्न १९७२ साली झाले होते. लग्नाच्या २३ वर्षांनंतर पतीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. या जोडप्यात अपत्य नसल्याच्या कारणावरुन वारंवार भांडणे होत असल्याची माहिती आहे. आपल्याशी पत्नी कधीच नीट वागली नाही, मूल होत नसल्यामुळे ती सतत टोमणे मारते, असा आरोप त्यांनी केला होता. उभयतांमधला वाद विकोपाला गेल्यामुळे १९९३ पासून ते विभक्त राहत होते. घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर टोमणे मारण्याच्या मुद्द्यावरुन कनिष्ठ न्यायालयाने त्यांचा घटस्फोट नामंजूर केला होता. त्याविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. न्यायमूर्ती के. के. तातेड आणि एस. के. कोतवाल यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी करताना मूल न होण्यावरुन टोमणे मारणे ही क्रूरता असल्याचे म्हणत त्यांचा घटस्फोट मंजूर केला. पण पत्नीला दरमहा खर्च देण्याचा आदेश देत पत्नी राहत असलेल्या घराबाबतही वाद न करण्यास सांगितले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002