व्हीएस न्यूज - केरळात सरकारनेच राजकीय दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे असा आरोप गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केला आहे. गोव्यात सध्या भाजपने जन रक्षा यात्रा सुरू केली आहे त्यात सहभागी होण्यासाठी पर्रिकर केरळात आले आहेत.
ते म्हणाले की डाव्या विचारांच्या सरकारने राज्यातील संघ आणि भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले करून अनेक हत्या घडवून आणल्या आहेत. देशात एकीकडे मोदींच्या नेतृत्वाखाली विकासाचे राजकारण सुरू असताना केरळ मध्ये मात्र दहशतीचे राजकारण सुरू आहे ही बाब अत्यंत घातक आहे. केरळातील सुसंस्कृत आणि सुशिक्षीत लोकांनी राज्य सरकारचे हे दहशतीचे वातावरण झुगारून द्यावे असे आवाहनही त्यांनी केले. आज या यात्रेत भाजपच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर याही सहभागी झाल्या होत्या. भाजपची ही जन रक्षा यात्रा पंधरा दिवसांची आहे. केरळात संघ आणि भाजप कार्यकर्त्यांच्या ज्या हत्या झाल्या आहेत त्याच्या विरोधात ही यात्रा आहे.