समाजात फूट पाडणाऱ्यांना धडा शिकवा - पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली
2018-01-17
व्हीएस न्युज - नवीन वर्षाची सुरवात ज्या हिंसाचाराच्या घटने मुळे झाली त्या कोरेगाव भीमा प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक बैठक घेतली, या वेळी देशात पुंन्हा पुन्हा कोरेगाव भीमा सारख्या घटना होऊ देऊ नका आसा आदेश मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे. नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी हि बैठक झाली. कोरेगाव भीमा दंगलीच्या सूत्रधारांचा बिमोड करा. जातीय विद्वेष रोखा समाजात फूट पाडणाऱ्यांना धडा शिकवा असे आदेश ही मोदींनी या वेळी दिले. या घटना समाजात तेढ निर्माण करणाऱ्या ,फूट पाडणाऱ्या आहेत. परंतु संघ आणि भाजप काहीही अघटीत घडु देणार नाही असेही मोदींनी या वेळी सांगितले.