व्हिएसन्यूज – पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी मुंबई पोलिसांची ड्युटी आता ८ तासांची केली आहे.त्यामुळे आता मुंबई पोलिसांना मोठे गिफ्ट मिळाले आहे.मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी ही घोषणा ‘मिशन 8 अवर्स’ या कार्यक्रमात केली.
कामाचे मुंबई पोलिसांना तास नाहीत. एकदा घरातून बाहेर पडलेला पोलिस कधी १२ तासांनी, कधी १६ तर कधी २४ तासांनी घरी परततो. पोलिसांचे आरोग्य,मानसिकता, कौटुंबिक आयुष्य या सर्वांवर त्यामुळे त्याचा विपरित परिणाम होतो. सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, तेच एकप्रकारे असुरक्षित असल्यामुळे पोलिसांच्या कामाचे तास निश्चित करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती.
आयुक्तांनी त्या पार्श्वभूमीवर अखेर पोलिसांच्या कामाचे तास निश्चित केले आहेत. याआधी ८ तासांची शिफ्ट प्रायोगिक तत्वावर देवनार पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर आजपासून मुंबईतील सर्वच पोलिस ठाण्यांमध्ये ८ तासांच्या शिफ्टची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.