व्हिएसन्यूज - पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत युनियनचे कार्यालय सील केल्यानंतर आता काँग्रेसप्रणीत इंटक या संघटनेला कार्यालय रिकामे करण्याची नोटीस बजावली आहे.
‘पीएमपी’च्या भांडार विभागासमोरील इमारतीत राष्ट्रवादी कामगार युनियनचे कार्यालय काही वर्षांपासून होते. हे कार्यालय मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महिनाभरातच रिकामे करण्याची नोटीस संघटनेला बजावली होती. हे कार्यालय मुदतीपूर्वी तीन महिने आधीच ताब्यात घेण्यात आले. संघटनेच्या वतीने याला तीव्र विरोधही करण्यात आला.
ही इमारत प्रशासकीय कारणासाठी आवश्यक असल्याने ताब्यात घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाने त्या वेळी स्पष्ट केले होते. आता हीच वेळ पीएमपी कामगार संघटनेवर (इंटक) आली आहे. इंटकला कार्यालय रिकामे करण्याची नोटीस पीएमपी प्रशासनाने बजावली आहे.