साहित्यातील मर्म राज ठाकरेंना कळतो का? साहित्य संमेलन अध्यक्ष
मुंबई
2018-01-18
व्हीएस न्यूज - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचीत अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना साहित्यातील मर्म कळत नसल्याची टीका केली आहे. तसेच साहित्यिकांविषयीची राज ठाकरेंची भूमिका चुकीची असल्याचीही टीका त्यांनी केली आहे. तात्कालिक आणि तात्काळ नव्हे तर साहित्यिक साहित्यातून भूमिका मांडतात असे देशमुख म्हणाले.
तर फक्त राजकारण आणि निवडणुकीसाठी राजकीय नेत्यांची भूमिका असते असे ते म्हणाले. दरम्यान त्यांनी मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय चुकीचा असून यावर राज्य सरकारचाही निषेध केला. महाराष्ट्र आणि मराठीसाठी आज महाराष्ट्रातील साहित्यिकांनी भूमिका घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सांगलीत भरलेल्या औदुंबर साहित्य संमेलनात केले होते.