व्हीएस न्यूज - इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी टाइम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत भारतासाठी जे चांगले आहे तेच पंतप्रधान मोदी करतात असे सांगताना मोदी हे फक्त भारताचाच विचार करीत असल्याने महान देशभक्त आहेत. असे उद्गार काढले आहेत.
संयुक्त राष्ट्रांद्वारे भारताच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील दहशतवादाला आंतरराष्ट्रीय दहशतवाद घोषित केले असल्यामुळे इस्रायलचा भारताच्या या कारवाईला पाठींबा आहे. दहशतवादाविरोधात परस्पर सामंजस्य भारत-इस्रायलदरम्यान असल्याने यापेक्षा वेगळे सांगण्याची गरज नाही. पण एखाद्या विशिष्ट देशाविरोधात इस्रायल नसल्याचेही नेतान्याहू यांनी यावेळी स्पष्ट केले. ते म्हणाले पाकिस्तानचा इस्रायल शत्रू नाही आणि इस्रायलला पाकिस्ताननेही आपला शत्रू समजता कामा नये.
दरम्यान, इस्रायलसोबतच्या मैत्रीवर भारतातील काही लोकांना आक्षेप आहे. याबाबत नेतान्याहू यांना विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मोठे देशभक्त असून प्रत्येक गोष्ट ते देशाच्या हिताचीच करतात. दहशतवादाविरोधात भारताची सुरक्षा, दुग्ध उत्पादनात वाढ आणि भाजीपाला उत्पादनात वाढीबाबत जेव्हा मोदी विचार करतात. तेव्हा ते केवळ याचा विचार करीत नाहीत की यामध्ये इस्रायलचा किती फायदा आहे. तर याचा भारताला किती फायदा आहे याचाच ते विचार करतात. त्यामुळे माझ्या मते मोदी योग्य आहेत.