सुपा पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र पाटील व त्यांच्या पथकाला पालकमंत्री मा .श्री राम शिंदे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आले.
सुपा
2018-01-27
व्हीएस न्युज - सुपा पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र पाटील व त्यांच्या पथकाला पालकमंत्री मा .श्री राम शिंदे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आले. मंगळवार दिनांक १६ /१ /२०१८ दौंड परिसरात तिघांवर गोळीबार करून खून करणाऱ्या एसआरपीएफचा जवान संजय शिंदे याला सुपा पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र पाटील व त्यांच्या पथकाने टोलनाक्यापासून काही अंतरावर सापळा रचून ताब्यात घेतले होते सदर आरोपी हा हत्यारबंद असलेला प्रशिक्षीत एसआरपीएफचा जवान होता म्हणून त्याला पकडणे जोखमीचे होते.
सुपा पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र पाटील व त्यांच्या पथकाची चालाख आणि जिगरबाज कामगिरी मुळे गौरवण्यात आले.