व्हीएस न्यूज - आयपीएलच्या अकराव्या हंगामाच्या लिलावाच्या पहिल्या दिवशी सर्व संघमालकांनी सर्वोत्तम खेळाडूंना आपल्या संघाकडे कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांनी रणनिती आखत महत्वाचे खेळाडू आपल्याकडे कायम राखले आहेत. पहिल्या दिवशी जेवणाची सुट्टी होईपर्यंत किंग्ज इलेव्हन पंजाबचा लिलावावर बोलबाला पहायला मिळाला. प्रिती झिंटा आणि विरेंद्र सेहवाग यांनी प्रत्येक खेळाडूवर बोली लावत चांगल्यातला चांगला खेळाडू आपल्या संघात कायम कसा राखता येईल याची जबाबदारी घेतली, आणि या प्रयत्नात त्यांना बऱ्याच प्रमाणात यश आलेलं पहायला मिळालं.
पहिल्या सत्रात काही अनपेक्षित निकाल पहायला मिळाले. विशेष करुन भारतीय खेळाडूंमध्ये काही जणांना अनपेक्षित बोली मिळाली तर काही महत्वाच्या खेळाडूंना नाममात्र बोलीवर समाधान मानावं लागलं. रणजी आणि स्थानिक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या मनिष पांडेला तब्बल ११ कोटी रुपये खर्च करुन सनराईजर्स हैदराबाद संघाने आपल्या ताफ्यात घेतलं आहे. याचसोबत भारतीय संघाचा कसोटी सलामीवीर लोकेश राहुललाही ११ कोटी रुपयांची बोली लागली. लोकेश राहुल नवीन हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळताना दिसेल. दुसरीकडे करुण नायरलाही आपल्या ५० लाख या मुळ किमतीवरुन चांगली रक्कम मिळाली. दोन संघमालकांमध्ये सुरु असलेल्या चढाओढीत करुण नायरला किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने ५ कोटी ६० लाखांच्या बोलीत आपल्या संघामध्ये कायम राखलं आहे. याव्यतिरीक्त परदेशी खेळाडूंमध्ये सर्वात जास्त बोली लागलेल्या खेळाडूंच्या यादीत सध्याच्या घडीला ख्रिस लिनने बाजी मारली आहे. ख्रिस लिनला कोलकाता नाईट रायडर्स संघाने ९ कोटी ६० लाखांची बोली लावली. तर इंग्लंडच्या ख्रिस वोक्ससाठी रॉयल चँलेजर्स बंगळुरु संघाने ७ कोटी ४० लाख रुपये मोजत आपल्या संघात घेतलं.
एकीकडे भारतीय खेळाडूंना अनपेक्षितपणे कोट्यावधी रुपयांच्या बोली लागत असताना, आतापर्यंत १० हंगाम गाजवणाऱ्या काही महत्वाच्या खेळाडूंना नाममात्र बोलीवर समाधान मानावं लागलं. गौतम गंभीर अवघ्या २ कोटी ८० लाखांच्या बोलीत दिल्ली डेअरडेविल्स संघाकडून खेळणार आहे. तर युवराजलाही २ कोटींच्या बोलीवर समाधान मानावं लागलं, यंदाच्या हंगामात तो किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळेल. तर गेली १० वर्ष मुंबईचं प्रतिनिधीत्व करत असलेला हरभजन सिंह यंदाच्या हंगामात धोनीच्या साथीने चेन्नईसाठी खेळताना दिसेल. याचसोबत चेन्नईने यंदा मराठमोळ्या केदार जाधवलाही आपल्या संघात कायम राखलं आहे. त्याला २ कोटी रुपयांची बोली लागली. त्यामुळे पुढच्या सत्रात नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पहावं लागणार आहे.
- अफगाणिस्तानच्या राशिद खानला तब्बल ९ कोटींची बोली, राईट टू मॅच कार्डाद्वारे हैदराबाद संघाने लावली बोली.
- अफगाणिस्तानच्या राशिद खानसाठी संघमालकांमध्ये चढाओढ.
- कर्ण शर्मा चेन्नई सुपर किंग्ज संघाकडे, बोली ५ कोटी.
- न्यूझीलंडच्या इश सोढीला बोली नाही
- इम्रान ताहिर १ कोटी रुपयांच्या बोलीवर चेन्नई सुपर किंग्ज संघात
- पियुष चावला कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे, बोली ४ कोटी २० लाख
- लसिथ मलिंगाला पहिल्या फेरीत कोणत्याही संघाकडून बोली नाही
- कगिसो रबाडा दिल्ली डेअरडेविल्स संघाकडे, राईट टू मॅच कार्डाद्वारे ४ कोटी २० लाखांची बोली
- मोहम्मद शमी नवीन हंगामातही दिल्लीकडून खेळणार, राईट टू मॅच कार्डाद्वारे शमीवर ३ कोटींची बोली
- भारताच्या इशांत शर्मालाही पहिल्या फेरीत बोली नाही
- न्यूझीलंडच्या टीम साऊदीला मात्र बोली नाही
- विदर्भ एक्स्प्रेस उमेश यादव बंगळुरुच्या यार्डात, रॉयल चॅलेंजर्सकडून ४ कोटी २० लाखांची बोली
- ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स मुंबई इंडियन्सकडे, बोली ५ कोटी ४० लाख
- मिचेल जॉन्सन, जॉश हेजलवूड यांच्यावर कोणत्याही संघाकडून बोली नाही
- बांगलादेशचा जलदगती गोलंदाज मुस्तफिजुर रेहमान मुंबई इंडियन्स संघाकडे, बोली २ कोटी २० लाख
- बटलरवर राजस्थानकडून ४ कोटी ४० लाखांची बोली
- इंग्लंडचा जोस बटलर आगामी हंगामात राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणार
- इंग्लंडच्या सॅम बिल्गींज्गवर बोली नाही
- अंबाती रायडू नवीन हंगामात चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळणार, बोली २ कोटी २० लाख
- संजू सॅमसनला तब्बल ८ कोटी रुपयांची बोली, नवीन हंगामात राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणार
- रॉबिन उथप्पा पुन्हा एकदा कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे, राईट टू मॅच कार्डाद्वारे कोलकात्याची ६ कोटी ४० लाखांची बोली
- नमन ओझावर बोली नाही
- दिनेश कार्तिक कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे, बोली ७ कोटी ४० लाख
- वृद्धीमान साहावर ५ कोटी रुपयांची बोली, सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळणार साहा
- जॉनी बेअरस्ट्रोवर बोली नाही
- क्विंटन डी कॉक २ कोटी ८० लाखांच्या बोलीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडे
- पार्थिव पटेलला बोली नाही
- इंग्लंडचा मोईन अली १ कोटी ७० लाखांच्या बोलीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळणार
- मार्कस स्टॉयनिस ६ कोटी २० लाखांच्या बोलीत किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळणार
- न्यूझीलंडचा कॉलिन मुनरो १ कोटी ९० लाखांच्या बोलीत दिल्ली डेअरडेविल्स संघाकडे
- युसूफ पठाणवर १ कोटी ९० लाखांची बोली, नवीन हंगामात सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळणार
- ऑस्ट्रेलियाच्या जेम्स फॉल्कनरवर बोली नाही
- कॉलिन डी ग्रँडहोम रॉयल चँलेजर्स बंगळुरु संघाकडे, बोली २ कोटी २० लाख रुपये
- शेन वॉटसनवर ४ कोटी रुपयांची बोली, धोनीच्या संघात आणखी एक अष्टपैलू खेळाडू
- मराठमोळा केदार जाधव ७ कोटी ८० लाखांच्या बोलीत चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडे
- कार्लोस ब्रेथवेटवर २ कोटी रुपयांची बोली, नवीन हंगामात सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळणार
- इंग्लंडचा ख्रिस वोक्स ११ व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळणार, वोक्सवर ७ कोटी ४० लाखांची बोली
- मनिष पांडेवर ११ कोटी रुपयांची बोली, नवीन हंगामात सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळणार पांडे
- न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टीलवर पहिल्या फेरीत बोली नाही
- दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलावर पहिल्या फेरीत बोली नाही
- ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळाडू ख्रिस लिन कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे, लिनवर ९ कोटी ६० लाखांची बोली
- इंग्लंडचा जेसन रॉय १ कोटी ५० लाखांच्या बोलीत दिल्ली डेअरडेविल्स संघाकडे
- ब्रँडन मॅक्यूलम ३ कोटी ६० लाखांच्या बोलीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडे
- अॅरोन फिंचवर किंग्ज इलेव्हन पंजाबकडून ६ कोटी २० लाखांची बोली
- डेव्हिल मिलर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडे, राईट टू मॅच कार्डाद्वारे ३ कोटी रुपयांची बोली
- मुरली विजयवर पहिल्या फेरीत कोणत्याही संघाची बोली नाही
- राहुलवर ११ कोटी रुपयांची बोली
- लोकेश राहुलला आपल्या संघात घेण्यात किंग्ज इलेव्हन पंजाब यशस्वी
- अखेर किंग्ज इलेव्हन पंजाब यशस्वी, करुण नायरला ५ कोटी ६० लाखांची बोली
- मुळ रक्कम ५० लाखांवरुन करुण नायरची कोट्यांमध्ये घौडदौड
- करुण नायरसाठी पंजाब आणि राजस्थानच्या संघमालकांमध्ये चढाओढ
- दुसऱ्या सत्रातल्या खेळाडूंचा लिलाव संपला, ५ मिनीटांची विश्रांती
- युवराज सिंह नवीन हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळणार, युवराजवर २ कोटी रुपयांची बोली
- इंग्लंडच्या जो रुटवर कोणत्याही संघाकडून बोली नाही
- केन विलियमसन ३ कोटी रुपयांच्या बोलीवर सनराईजर्स हैदराबाद संघात
- ब्राव्होवर ६ कोटी ४० लाखांची बोली
- राईट टू मॅच कार्डाद्वारे चेन्नई सुपर किंग्जने ड्वेन ब्राव्होला संघात परत घेतलं
- गौतम गंभीरवर २ कोटी ८० लाखांची बोली
- गौतम गंभीर माहेरी परतला, नवीन हंगामात दिल्ली डेअरडेविल्स संघाकडून खेळणार
- ग्लेन मॅक्सवेल ९ कोटी रुपयांमध्ये दिल्ली डेअरडेविल्स संघाकडून खेळणार
- हैदराबाद विरुद्ध दिल्लीच्या लढाईत दिल्लीची बाजी
- ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलसाठी संघमालकांमध्ये पुन्हा एकदा चढाओढ
- बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन सनराईजर्स हैदराबाद संघाकडे, बोली २ कोटी रुपये
- मुंबई इंडियन्सचा हरभजन सिंह चेन्नईच्या ताफ्यात, हरभजनवर २ कोटी रुपयांची बोली
- पहिल्या खेळाडूंचा संच संपला, आता १५ मिनीटांची विश्रांती
- ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क ९ कोटी ४० लाखांच्या बोलीत कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे
- अजिंक्य रहाणे माहेरी परतला, राजस्थान रॉयल्सची रहाणेवर राईट टू मॅच कार्डाद्वारे ४ कोटींची बोली
- डु प्लेसीसवर १ कोटी ६० लाखांची बोली
- दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसीस राईट टू मॅच कार्डाद्वारे चेन्नई सुपर किंग्जकडे
- बेन स्टोक्स राजस्थान रॉयल्स संघाकडे, बोली १२ कोटी ५० लाख
- इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्ससाठी संघमालकांमध्ये चढाओढ
- वेस्ट इंडिजचा धडाकेबाज खेळाडू ख्रिस गेलवर पहिल्या फेरीत कोणत्याही संघाकडून बोली नाही
- कायरन पोलार्ड मुंबई इंडियन्स संघाकडे, राईट टू मॅच कार्डाद्वारे ५ कोटी ४० लाखांची बोली
- अखेर रविचंद्र आश्विन किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडे, ७ कोटी ६० लाखांच्या बोलीत नवीन संघाकडून खेळणार
- रविचंद्रन आश्विनसाठी संघमालकांमध्ये चढाओढ
- राईट टू मॅच कार्डाद्वारे शिखर ५ कोटी २० लाखात हैदराबाद संघाकडे
- पहिल्या खेळाडूची बोली लागली, शिखर धवन सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळणार
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002