व्हीएस न्यूज – धर्मा पाटील यांची शेतकरी विरोधी सरकारने एकप्रकारे हत्याच केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारी प्रकल्पासाठी घेतलेल्या शेतजमिनीला योग्य मोबदला मिळावा यासाठी आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील (वय ८४) यांच्या मृत्यूनंतर घणाघाती टीका केली आहे.
सरकारने उर्जा प्रकल्पासाठी शिंदखेडाचे रहिवासी असलेल्या धर्मा पाटील यांच्या मालकीची शेतजमीन ताब्यात घेतली. पण सरकारी भावाने यासाठी पैसे देण्यात आले. धर्मा पाटील गेली दोन वर्ष या अन्यायाविरोधात लढा देत होते. त्यांनी आठवडाभरापूर्वी मंत्रालयात विषप्राशन केले होते. जे जे रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. विरोधकही धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर आक्रमक झाले आहेत. ट्विटरवरुन सरकारवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीकास्त्र सोडले. जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. एकप्रकारे या शेतकरीविरोधी सरकारने त्यांची हत्याच केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे, असे ट्विट त्यांनी केले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002