व्हिएस न्यूज- जामखेडा परिसरात पुर्व वैमनस्यातुन डॉक्टरसह एकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. डॉ. सादिक मोहम्मद खान पठाण, वय- ४० रा जामखेड आणि त्यांचा जोडीदार कय्युम पठाण, वय- ३५ वर्षे या असे गोळीबारात गंभीर झालेल्यांची नावे आहेत्र. या दोघांवर शहरातील नगर रोडवरील पंचायत समितीसमोर गाडी अडवुन हल्ला करत गोळीबार झाला. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे हलवण्यात आले आहे. आरोपी बीड जिल्ह्य़ातील नाळवंडी येथीलअसल्याचे सुत्रांकडून समजते.