व्हीएस न्यूज – भाजपने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना त्यांना घातलेल्या महागड्या जॅकेटमुळे लक्ष्य केले. यावर काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढत असल्यानेच भाजप निराश झाल्याची टीका काँग्रेसने केली आहे. भाजप नेत्यांना राहुल गांधींच्या जॅकेटच्या किमती पाहण्याशिवाय दुसरे काम नाही का, अशा शब्दांत भाजपची खिल्ली उडवली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राहुल गांधी हे मेघालयामध्ये प्रचार करत आहेत. त्यांनी यावेळी घातलेले जॅकेट हे ब्रिटनच्या प्रसिद्ध ब्रँडचे असून त्याची किंमत सुमारे ७० हजार रुपये असल्याचा दावा भाजपने केला. यावर काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत भाजपच्या आरोपाची खिल्ली उडविली. ते जॅकेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना हवे असेल तर मी ७०० रुपयांमध्ये आणू शकते. त्यांच्या छातीचे ५६ इंचाशिवाय दुसरे माप आपल्याला माहीत नसल्याचेही त्यांनी उपरोधिकपणे म्हटले.
मला यावर हसावे की रडावे ते कळत नाही. राहुल गांधींच्या जॅकेटच्या किमती पाहण्याशिवाय भाजप कार्यकर्त्यांना दुसरे काम नाही का? भारतात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आले असताना पंतप्रधान मोदींनी त्यांच्या नावाचे जॅकेट घातले होते. त्यानंतर या जॅकेटचा कोट्यवधी रुपयांत लिलाव करण्यात आला होता. तेच सरकार राहुल गांधींच्या जॅकेटवरून राजकारण करत आहे, असेही चौधरी म्हणाल्या.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002