व्हीएस न्यूज – भारतीय संघ १९ वर्षांखालील आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करून विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम करेल, असा विश्वास भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केला आहे. सौरव गांगुली क्रिकेट ईयर बुक या पुस्तकाच्या २० व्या वर्धापनदिनी पत्रकारांशी बोलत होता. मंगळवारी भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला २०३ धावांनी पराभूत करून अंतिम फेरी गाठली आहे.
गांगुलीने यावेळी शुभमन गिल, कमलेश नागरकोटी, शिवम मावी आणि ईशान पोरेल हे खूप प्रतिभावान खेळाडू संघात असल्याचे मत मांडले. भारतीय क्रिकेट व्यवस्थेची संरचना खूप चांगली आहे आणि या संरचनेशिवाय तुम्ही क्रिकेटपटू तयार करू शकत नाही. भारतीय क्रिकेटच्या या संरचनेतून हे खेळाडू तयार झाले आहेत. भारतीय क्रिकेट पुढील पाच वर्षांत ऑस्ट्रेलिया व इंग्लंडला मागे टाकून जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेट संघ बनेल, असा विश्वास गांगुलीने व्यक्त केला. इंडियन प्रीमियर लीगची क्रिकेटप्रेमींमध्ये खूप आवड आहे, ते स्टेडियम गच्च भरू शकतात. आयपीएल क्रिकेटप्रेमींच्या पाठिंब्यामुळे खूप पुढे जाईल, असे गांगुली म्हणाले. भारत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली नक्की जिंकेल. भारताने प्रत्येक सामन्यात सहज विजय मिळविला असून ऑस्ट्रेलियाचा १०० धावांनी पराभव केला होता. त्याची पुर्नरावृत्ती अंतिम सामन्यात भारताने करावी, अशी आशाही गांगुलीने व्यक्त केली. बंगालचा मध्यमगती गोलंदाज इशान पोरेलने उपांत्य फेरीत ६ षटकात १७ धावात ४ बळी घेतल्याबद्दल विचारले असता गांगुली म्हणाला की, तो बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या व्हिजन २०२० चा खेळाडू आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002