बदलत्या जीवनशैलीला आचाराने आणि विचाराने कृतीशील बनवा
पिंपरी चिंचवड
2018-02-02
व्हीएस न्यूज - विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मानवी जीवन अमूलाग्र बदलले. यामध्ये नैतिक आचार आणि विचाराची मोठ्या प्रमाणात घसरण झाली. विभक्त कुटुंबपध्तीमुळे संवाद हरवला. हव्यास वाढला. मोकळीक वाढली. बंधन नाहीशी झाली. त्यामुळे भारतामध्ये घटस्फोटाच्या प्रमाणात सध्य परिस्थितीत मोठी वाढ झाली आहे. यासाठी संस्कृती आचार आणि विचार यांना कृतीशील बनवणे व वास्तव जीवन जगणे हेच आपले कर्तव्य असणार आहे, असे मत प्रा. शितल वाघमारे व प्रा. प्रकाश ताम्हाणे यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि भगवान महावीर एज्युकेशन सोसायटी संचलित प्रितम प्रकाश कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आजीवन अध्ययन आणि विस्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत 'विवाहपूर्व समुपदेशन' या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी ते बोलत होते. य़ाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य, सदाशिव कांबळे होते. प्रशासकीय अधिकारी भास्कर पांडुरंग यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विभा ब्राम्हणकर यांनी केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. विजय निकम यांनी केले. आभार डॉ. हनुमंत शिंदे यांनी मानले.