व्हीएस न्यूज - टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सहा एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत विजयाने सुरुवात केली आहे. कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या टीम इंडियासाठी ही दिलासादायक बाब असून कर्णधार विराट कोहलीचेही भारताच्या विजयात मोठे योगदान होते. ११९ चेंडूत त्याने ११२ धावांची खेळी केली.
या शतकासोबतच मोठ्या विक्रमाची बरोबरी विराटने केली असून त्याने कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची बरोबरी केली. कर्णधार या नात्याने गांगुलीच्या नावावर १४६ सामन्यात ११ शतके आहेत. तर हा आकडा विराटने ४४ सामन्यातच गाठला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंह धोनी या दोघांच्याही नावावर कर्णधार या नात्याने प्रत्येकी सहा शतके आहे.