व्हीएस न्यूज - काँग्रेसने भाजपला राजस्थानमधील अलवर, अजमेर लोकसभा आणि मांडलगढ विधानसभेच्या पोट निवडणुकीत जोरदार धक्का दिला आहे. काँग्रेसने येथे लोकसभेच्या दोन आणि विधान सभेची एक जागा जिंकली आहे.
मतमोजणी सकाळी सुरु झाली तेव्हाच काँग्रेसने आघाडी घेतली होती. काँग्रेसने अजमेर आणि अलवर लोकसभा पोटनिवडणुकीत आघाडी घेतली होती. तर भाजपने मांडलगढ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मागे टाकले होते. पण तेथेही काँग्रेसने बाजी मारली आहे. दरम्यान, राज्यस्थानमध्ये भाजपची निर्विवाद सत्ता असल्यामुळे भाजपचा हा पराभव म्हणजे जोरदार धक्का आहे.
या तीन ठिकाणी भाजप खासदार प्रा. सांवर लाल जाट (अजमेर), खासदार चांद नाथ योगी (अलवर) आणि आमदार कीर्ति कुमारी (मांडलगढ) यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली. त्याची आज मतमोजणी सुरु झाली. राजस्थानमधील लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने आघाडी घेतली होती. त्यामुळे भाजपच्या गोटात चिंता होती. तर दुसरीकडे काँग्रेसने आधीच विजयाचा दावा केला होता आणि तो दावा त्यांनी निवडणूक जिंकून खरा केला आहे.
अलवर लोकसभा मतदार संघातून भाजपचे जवंसत सिंग यादव विरुद्ध काँग्रेसचे डॉ. करण सिंग यादव (४० हजार मतांनी) तर अजमेर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे रघु शर्मा विरुद्ध भाजपचे रामस्वरुप लांबा अशी लढत झाली. २०,६४८ मतांनी रघु शर्मा विजयी झालेत. तर मांडलगढ विधानसभा निवडणुकीत भाजपचे शक्ति सिंग हाडा विरुद्ध काँग्रेसचे विवेक धाकड यांच्यात लढत झाली.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002