व्हीएस न्यूज – गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारचा अभिनेता संजय दत्त याला तुरुंगातून लवकरच सोडण्याचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा दिला. १९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या संजय दत्तची आठ महिने लवकर सुटका करण्यात आली होती. उच्च न्यायालयात या सुटकेविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. आज न्यायमूर्ती एस.सी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर त्यावर सुनावणी झाली. यावेळी यासंदर्भातील गृह खात्याच्या निर्णयाची कागदपत्रे राज्य सरकारने न्यायालयात सादर केली. यावरून कोणाताही दुजाभाव संजय दत्तला तुरुंगातून लवकर सोडताना केला नाही, हे सिद्ध होत असल्याचे न्यायालयाने म्हटले.
आम्हाला कोणताही विरोधाभास गृहमंत्रालयाने सादर केलेली कागदपत्रे आणि राज्य सरकारने दिलेल्या स्पष्टीकरणात आढळलेला नाही. नियमांचे उल्लंघन किंवा अधिकारांचा गैरवापर झाल्याचेही यामध्ये दिसत नसल्याचे सांगत ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. पण यावेळी न्यायालयाने भविष्यात कैद्यांची पॅरोल किंवा फर्लो रजा मंजूर करताना गरज लक्षात घेऊन आणि पारदर्शक धोरणाचा अवलंब करावा, असे सांगितले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002