व्हीएस न्यूज - परराष्ट्र मंत्रालयाने अवघ्या तीन दिवसात तात्काळ पासपोर्ट हाती देण्याची सुविधा केली असून परराष्ट्र मंत्रालयाने तात्काळ पासपोर्टसाठी क्लास वन श्रेणीतील अधिकाऱ्याकडून सत्यप्रत प्रमाणपत्र आणण्याची अट शिथील केली असल्यामुळे तुम्हाला आता तिसऱ्या दिवशी तात्काळ पासपोर्ट मिळू शकेल. साधारण ३ हजार ५०० रुपये तात्काळ पासपोर्ट काढण्यासाठी मोजावे लागणार आहेत.
तुम्हाला आधार कार्डासोबत नियमाप्रमाणे ठरलेल्या विविध १२ प्रमाणपत्रांपैकी कोणत्याही दोन प्रमाणपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. या सर्व कागदपत्रांची योग्य पूर्तता झाल्यानंतर पासपोर्ट तयार होऊन पोलिस रिपोर्ट मागवण्यात येईल. त्याचबरोबर केंद्र सरकारने अकुशल कामगारांना केशरी पासपोर्ट देण्याचा निर्णय मागे घेतला आहे. त्याचप्रमाणे पासपोर्टचे शेवटचे पान कोरे ठेवण्याचा निर्णयही रद्द करण्यात आला आहे.