मुख्यमंत्री हे रतन खत्रीकडे कामाला होते का ? : राज ठाकरे
सातारा
2018-02-02
व्हीएस न्यूज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विकासकामांच्या बाबतीत रोज नवे आकडे देत आहेत. रतन खत्रीकडे ते काय कामाला होते का?, अशी बोचरी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. राज ठाकरे सातारा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना सरकार आणि विरोधकांवरही तोंडसुख घेतले.
पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्या खास शैलीत शाब्दिक फटकारे लगावले. मोदींचे हे शेवटचे बजेट आहे. तेवढ्या वेळात आज आपला हिशोब आटोपून घेऊ, अशी मिश्किल टिपण्णीही त्यांनी केली. त्यांनी यावेळी बोलताना अनेक विषयांना हात घालत आपल्या खास शैलीत शाब्दिक फटकारे लगावले. शाहू, फुले,आंबेडकरांचे नाव निवडणूक जिंकण्यासाठी घेतले जाते. जातीपातीच्या राजकारणात महाराष्ट्राला अडकवून पुढाऱ्यांनी वाटोळे केल्याचेही राज म्हणाले.