व्हीएस न्यूज - करणी सेना आणि इतर राजूपत संघटनांकडून ‘पद्मावत’ चित्रपटाला होणारा विरोध, चित्रपटावर मेवाडच्या राजघराण्याकडून असणारी नाराजी यासोबतच ‘पद्मावत’पुढे अभिनेता अक्षय कुमारची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘पॅडमॅन’ या चित्रपटाचे आणखी एक आव्हान होते. पण ऐनवेळी ‘पद्मावत’साठी अक्षय कुमारने एक महत्त्वाचा निर्णय घेत या चित्रपटाच्या वाटेतील एक अडथळा दूर केला.
अक्षयने ‘पद्मावत’ चित्रपटाचे प्रदर्शन सुरळीत होण्यासाठी त्याचा बहुचर्चित ‘पॅडमॅन’ हा चित्रपट ‘पद्मावत’नंतर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. अक्षयने आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख भन्साळींच्या बिग बजेट चित्रपटाचे महत्त्व आणि त्यांनी आतापर्यंत सामना केलेल्या अडचणींचा आढावा घेत बदलली. अक्षयने हा निर्णय मोठ्या मनाने घेतला आणि त्याला पाहून भन्साळीही भारावले. ‘पद्मावत’च्या यशामध्ये अक्षयने मनापासून शुभेच्छा देत त्याने एक प्रकारे महत्त्वाची भूमिका बजावली असे म्हणायला हरकत नाही. आता भन्साळी एका वेगळ्या मार्गाने त्याच्या याच उपकारांची परतफेड करणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या काळात अक्षयसोबत एका चित्रपटावर भन्साळी काम करणार असून याद्वारे ते त्याच्या उपकारांची परतफेड करणार आहेत. दरम्यान, ९ फेब्रुवारीला अखेर ‘पॅडमॅन’च्या रुपात अक्षय प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002