व्हीएस न्यूज - येत्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकजुटीचा प्रयत्न करत आहेत. मात्र मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने या प्रयत्नांना खोडा घातला असून काँग्रेस हीच विरोधकांच्या एकतेचा कणा बनेल, असे म्हटले आहे. तसेच नरेंद्र मोदी यांना पर्याय केवळ राहुल गांधीच असू शकतात, असेही पक्षाने म्हटले आहे.
काँग्रेसचे माध्यम विभागाचे प्रमुख आणि मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे. ‘‘मोदींजीचा पर्याय केवळ आणि केवळ राहुलजी हेच आहेत. अन्य कोणीही होऊ शकत नाही. काँग्रेस आणि देशातील लोक राहुलजींना देशाचा पुढील पंतप्रधान म्हणून पाहू इच्छितात,’’ असे ते म्हणतात.
‘‘आज दोन मॉडेल आहेत…मोदी मॉडेल यात ते दिवसातून सहा वेळेस कपडे बदलतात, आपल्या कपड्यांची सुरकुतीही बिघडू देत नाहीत, आपल्या वेशभूषेवर शासनापेक्षा जास्त वेळ घालवतात. दुसरे मॉडेल आहे राहुल गांधी यांचे. ते साधेपणा, सरळता आणि स्पष्टतेवर आधारित आहे. राहुल गांधी राजकारणात त्यांची निर्भीडता, पारदर्शकता आणि प्रामाणिकतेमुळे प्रसिद्ध झाले आहेत. ते कठोर निर्णय घ्यायला घाबरत नाहीत,’’ असे ते म्हणाले. विरोधकांच्या एकजुटीबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘‘बिजू जनता दल, शिवसेना आणि आता तेलुगु देसम हे पक्ष हळूहळू वेगळे होत आहेत. तर काँग्रेस वेगवेगळ्या पक्षांच्या एकतेचा कणा बनत आहे. ही एकता 2019 मध्ये बदलांचा आधार बनेल.’’
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002