व्हीएस न्यूज - मुंबईत 2008 साली झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मिळालेल्या 4600 बुलेट प्रूफ जॅकेटपैकी एक तृतीयांश जॅकेट महाराष्ट्र पोलिसांनी परत केली आहेत. एके-47 बंदुकीच्या गोळ्यांच्या चाचणीत अयशस्वी ठरल्यामुळे हे जॅकेट परत करण्यात आले आहेत. कानपूर येथील उत्पादन कंपनीकडून तीन टप्प्यांमध्ये हे जॅकेट आले होते. त्यातील 1430 जॅकेट परत करण्यात आले आहेत. ही कंपनी अन्य केंद्रीय सुरक्षा दलांनाही अशा प्रकारचे जॅकेट पुरवते.
‘‘एके-47च्या गोळ्यांच्या चाचण्यांमध्ये अयशस्वी ठरल्यामुळे आम्ही 1400 पेक्षा अधिक बुलेट प्रूफ जॅकेट उत्पादक कंपनीला परत केले आहेत,” असे अतिरिक्त पोलिस महासंचालक (खरेदी आणि समन्वय) व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले.
पोलिस खात्याने या कंपनीला 5,000 बुलेट प्रूफ जॅकेट पुरविण्याचा आदेश दिला होता. सीमा शुल्क ड्यूटी आणि अन्य शुल्कांसह कंपनीला 17 कोटी रुपये देण्यात आले होते आणि त्या बदल्यात 4600जॅकेट खात्याला मिळाले होते. चंडीगड येथील केंद्रीय फोरेन्सिक विज्ञान प्रयोगशाळा येथे करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये सुमारे 3,000 जॅकेट उत्तीर्ण झाले, अशी माहिती अन्य एका अधिकाऱ्याने दिली. मात्र 1,430 जॅकेटमधून चाचण्यांदरम्यान एके-47च्या गोळ्या आरपार गेल्या त्यामुळे ते परत करण्यात आले.
‘‘आम्ही उत्पादकांना नव्या मालातून 1,430 जॅकेट बदलण्यास सांगितले. बुलेटप्रूफ जॅकेटचा दर्जा आणि मानकांसोबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि आम्ही ते बुलेटप्रूफ जॅकेट तपासणी करूनच घेऊ,’’ असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002