व्हीएस न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी आखाती देशांना भेट देत असून मोदी ११ फेब्रुवारी रोजी विक्रमी संख्येने उपस्थित राहणाऱ्या भारतीयांना मित्रों अशी साद घालताना प्रथमच दिसणार आहेत. हा दौरा फेब्रुवारी ९ ते १२ या दरम्यान असून हा ऐतिहासिक सोहळा मस्कत, ओमान येथे रंगणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मोदींविषयी ओमानमध्ये प्रचंड कुतूहल असून मोदींचे मस्कतच्या सुलतान कुबूस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये अनिवासी भारतीयांच्या सभेत भाषण ठेवण्यात आले आहे. ओमानमधील हे सर्वात मोठे स्टेडियम आहे.
ओमानच्या सरकारी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींचे भाषण ऐकण्यासाठी येथे खूपच उत्सुकता असल्याचे म्हटले आहे. मोदी नेहमीच जगभरातील भारतीयांशी संवाद साधण्यासाठी तत्पर असतात आणि जगभरातील भारतीयांना देशाचे राष्ट्रदूत किंवा एकप्रकारे अँबॅसिडर असेच ते संबोधतात असे एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.
मोदींना या दौऱ्यात अबू धाबीमध्ये पहिले मंदीर बांधण्यात येणार असून या मंदिराच्या शिला–पूजन समारंभाची व्हिडीओ लिंकही बघायला मिळणार आहे. मोदींसाठी पश्चिम आशियातील हा दौरा या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या आखाती देशांमध्ये केवळ दुबईमध्ये हिंदूंचे एकमेव मंदिर आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002