व्हीएस न्यूज - बॉक्स ऑफीसवर संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित ‘पद्मावत’ चित्रपट चांगलीच कमाई करत असून मागच्या वर्षी सुपर हिट ठरलेला‘टायगर जिंदा है’ चित्रपटाचा रेकॉर्ड या चित्रपटाने तोडला आहे. चित्रपटाने १० दिवसाच्या आतच २०० कोटींचा आकडा पार केला आहे.
‘पद्मावत’ने प्रदर्शित झाल्यानंतर नवव्या दिवशी १६ कोटींची कमाई केली. त्याचबरोबर ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाने १४ कोटी कमविले होते. अभिनेता रणवीर सिंह पद्मावतच्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाल्याबद्दल खूपच आनंदात आहे. यावर तो म्हणाला, की बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला यश प्राप्त होण्याचे कारण म्हणजे मनोरंजनाच्या रुपात चांगले काम केले आहे. कलाकारांचे मनोरंजन करण्यात यश म्हणजेच चित्रपटाचे यश होय. यावर दीपिका पदुकोण म्हणाली, की यावेळी बॉक्स ऑफिसचे कलेक्शन महत्वाचे आहे. चित्रपटाच्या शुटींगसाठी भरपूर पैसे लागले, चित्रपटाची जास्त कमाई होणे महत्वाचे आहे.