व्हीएस न्यूज - - कारच्या नोंदणीवरुन सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला असून तुम्ही कार विकल्यानंतरही वाहनाच्या नोंदणीत बदल केले नसतील आणि त्या कारमुळे अपघात झाल्यास मूळ मालकालाही संबंधितांना भरपाई द्यावीच लागेल, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
दरम्यान १२ जुलै २००७ मध्ये विजय कुमार यांनी त्यांची कार विकली होती. तिच कार त्या व्यक्तीने नवीन कुमार यांना विकली आणि नवीन कुमार यांनी मिरसिंह यांना ती कार विकली होती. कारचा मिरसिंह यांच्या ताब्यात असताना अपघात झाला. मिरसिंह अपघात झाला त्यावेळी कार चालवत नव्हते. एकाचा या अपघातात मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला होता. मूळ मालक विजयकुमार आणि अपघात घडला त्यावेळी जी व्यक्ती कार चालवत होती ती व्यक्ती अशा दोघांनी मिळून मृतांच्या कुटुंबीयांना ३ लाख ८५ हजार रुपयांची भरपाई द्यावी, असे आदेश मोटार अपघात न्यायाधिकरणाने दिले.
पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयात या निर्णयाला विजयकुमार यांनी आव्हान दिले. विजयकुमार यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला. कार विकल्याचे पुरावे असल्यामुळे त्यांच्याकडून भरपाई घेता येणार नाही, असे विजय कुमार यांनी उच्च न्यायालयात सांगितले होते. या निर्णयाला नियमानुसार ज्या व्यक्तीच्या नावावर वाहनाची नोंदणी आहे तिच्याकडूनच भरपाई घेतली पाहिजे, असे सांगत सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. यावर सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने निर्णय दिला. या प्रकरणात मालकाने वाहन विकले होते. पण त्याने वाहनाच्या नोंदणीत बदल न केल्यामुळे भरपाई त्यांना देखील द्यावीच लागेल असे न्यायालयाने स्पष्ट केले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002