झुलन गोस्वामी २०० विकेट घेणारी पहिली महिला क्रिकेटपटू
मुंबई
2018-02-08
व्हीएस न्यूज - भारतीय महिला क्रिकेट टीम मधील वेगवान गोलंदाज ३५ वर्षीय झुलन गोस्वामी हिने तिच्या करियरचा १६६ वा सामना खेळत अस्तात्ना एक दिवसीय सामन्यात २०० विकेट घेऊन विश्वविक्रम नोंदविला आहे. असा विक्रम करणारी ती पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली आहे. भारत व द.आफ्रिका याच्यात सुरु असलेल्या आयसीसी महिला चँपियनशिप साठीच्या तीन सामन्याच्या मालिकेत झुलनने द.आफ्रिकेची सलामी फलंदाज लारा वूलवार्तची विकेट घेऊन हा विक्रम नोंदविला आहे. या मालिकेत भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे.
झुलनने २००२ मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केले असून २००७ मध्ये ती आयसीसीची सर्वश्रेष्ठ महिला क्रिकेटर म्हणून निवडली गेली होती. २०१७ सालातील ती सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली आहे. एक दिवसीय सामन्यात भारतासाठी २०० विकेट घेण्याची कामगिरी कपिल देव याने सर्वप्रथम १९९१ साली नोंदविली आहे.