व्हीएस न्यूज - सिनेदिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’वरून भारतात रंगलेला वाद थांबला असतानाच आता पाकिस्तानातही ‘पद्मावत’वरून वाद निर्माण झाला आहे. या सिनेमात अल्लाउद्दीन खिलजीला खलनायक दाखवून मुसलमानांची प्रतिमा चुकीची रंगविल्याने या सिनेमावर बंदी घालण्यात यावी,अशी मागणी करणारी याचिका लाहोर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
सेन्सॉर बोर्डाची मंजुरी मिळाल्यानंतर दोन आठवडय़ांपूर्वी ‘पद्मावत’ पाकिस्तानात झळकला. मात्र, या सिनेमात मुसलमानांची प्रतिमा चुकीची रंगवल्याचा आरोप करण्यात आल्याने हा चित्रपट अडचणीत सापडला आहे. लाहोर न्यायालयाने याचिका दाखल करून घेत पंजाब सेन्सॉर बोर्डाला या सिनेमाचे पुनरावलोकन करण्यास सांगितले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर सिनेमाचं पुनरावलोकन करण्यासाठी बोर्डाने बैठकीचं आयोजन केलं आहे. तशी पत्रही सदस्यांना पाठविण्यात आली आहेत.
‘पद्मावत’मधील दृश्य आणि संवाद ऐकून नंतरच सिनेमावरील बंदीबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या आधी भारतातही ‘पद्मावत’ला विरोध करण्यात आला होता. गोवा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हरयाणा या चार राज्यात या सिनेमावर बंदी घालण्यात आली होती. हा सिनेमा प्रदर्शित होऊ नये म्हणून ठिकठिकाणी जाळपोळही करण्यात आली होती.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002