नरेंद्र मोदी कुणाचेच ऐकून घेत नाहीत – राजेंद्रसिंह
अहमदनगर
2018-02-09
व्हीएस न्यूज – विरोधकांचेही म्हणणे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी ऐकून घेत होते. पण नरेंद्र मोदी कुणाचोच ऐकून घेत नाहीत, असा गंभीर आरोप पाणीवाले बाबा म्हणजेच राजेंद्रसिंह यांनी अहमदनगरला जलसाक्षरता कार्यशाळेच्या वेळी केला आहे.
२० हजार कोटींची तरतूद मोदींनी स्वच्छ गंगा जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी केली. पण त्यातील २ टक्केही खर्च करु शकले नाहीत. फार मोठे काम मोदी करतील असे वाटत होते. परंतु त्यांनी सपशेल निराशा केली असल्याचे स्पष्ट मत सिंह यांनी यावेळी मांडले आहे. सिंह यांनी नदीजोड प्रकल्पावरून नाराजी व्यक्त केली. देशाला सध्याच्या नदीजोड प्रकल्पामुळे मोठा धोका असल्याचेही त्यांनी सांगितले. वाजपेयींना समजाऊ शकत होतो. ते मोठ्या मनाचे आणि विरोधकांचे म्हणणे ऐकून घेणारे होते. मात्र मोदी ऐकतच नसल्याचे सिंह यांनी सांगितले.