व्हीएस न्यूज – पाकिस्तान आणि सौदी अरेबियात काम करणाऱ्या दहशतवादी संघटनांची अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (एआयएमपीएलबी) ही एक शाखा असल्याचा खळबळजनक आरोप शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी केला आहे.
भारतातील मुसलमानांशी संबंधित महत्वाचे निर्णय पाकिस्तान आणि सौदी अरेबियातील दहशतवादी संघटना घेतात. अशा दहशतवादी संघटनांची मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड शाखा आहे. जे आपल्या विचारांच्या आधारावर देशाचे वातावरण बिघडवत असल्याचे रिझवी यांनी अधिकृत निवेदनात म्हटले आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे राम मंदिर उभारण्याचे समर्थन करणारे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य मौलाना सलमान नदवी यांना बोर्डातून काढण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर रिझवींनी हा आरोप केला आहे.
एआयएमपीएलबीला दहशतवादी संघटना घोषित करून त्यावर बंदी घालावी असे रिझवी यांनी म्हटले आहे. नदवीच्या भूमिकेचे समर्थन करताना रिझवी म्हणाले, अयोध्येत राम मंदिर बांधले जावे आणि दुसरीकडे एका जागेवर आपला मस्जिद बांधण्याचा एकमेव मार्ग आहे. मौलाना सलमान हुसैनी नदवी यांनी ९ फेब्रुवारी रोजी श्री श्री रवीशंकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत राम मंदिर बांधणीस पाठिंबा दर्शविला होता.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002