व्हीएस न्यूज - तूप विकण्याच्या बहाण्याने घरात घुसलेल्या दोन भामट्यांनी तुमचे नातेवाईक आप्पाशी बोला, असे सांगून महिलेचे 6 तोळे दागिने व रोकड असलेला डबा घेवून भामटे पसार झाले. ही घटना मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास चिंचवड येथील श्रीसाई हौ. सोसायटीमध्ये घडली. याप्रकरणी कुसूम लालासाहेब झोडगे (वय-58, रा. श्रीसाई हौ. सोसायटी, चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. झोडगे यांचा मुलगा ठाण्यात सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड परिसरात मंगळवारी सकाळी दोन भामटे गावरान तुप विकण्यास आले होते. झोडगे यांना भामट्यांनी तुप दाखविले. झोडगे तुप घेवून पैसे आणण्यासाठी घरात गेल्या. पैसे घेवून येताना त्यांनी सोने व पैशांचा डबा बाहेर आणला. त्यातून शंभर रूपये काढून भामट्यांना दिले. त्याचवेळी एकाने मोबाईलवरून फोन लावत आप्पाशी बोला, असे सांगितले. रेंज कमी आहे खिडकी जवळ जाऊन बोला असे सांगून त्या खिडकीजवळ गेल्यानंतर त्यांची नजर चुकवून दागिने व पैसे घेवून भामटे पसार झाले.
निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002