व्हिएस न्यूज – नोटाबंदी ही कल्पना कुठून आली हे तुम्हाला माहिती आहे का? आरबीआय, अरुण जेटली किंवा अर्थ मंत्रालयातील अधिकारी यांची नोटाबंदीची कल्पना नाही. तर आरएसएसची ही विचारधारा होती. ही कल्पना त्यांनी पंतप्रधान मोदींवर लादली. मोदी यांनी त्यानंतर नोटाबंदी केली, अशा शब्दांमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पुन्हा एकदा भाजप आणि संघावर टीका केली आहे.
हिंदुस्थानातील संस्थांना काबीज करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. आपल्या कार्यकर्त्यांना प्रत्येक संस्थेत टाकण्याचा प्रयत्न आरएसएस करत आहे. प्रत्येक मंत्रालय आणि विभागात आरएसएसची लोक आहेत. सध्या मोदी सरकार संघ चालवत असल्याचा घणाघाती आरोप राहुल गांधी यांनी केला.