फक्त एक शिट्टी मारायचा अवकाश की, सीमेवर लाखोंची फौज जमेल
नागपूर
2018-02-15
व्हीएस न्यूज - शिवसेनेने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता भाजपसोबतराष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. शिवसेनेने आतापर्यंत भाजपच्या नेत्यांवर अनेकदा थेटपणे टीका केलीअसली तरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या इतर नेत्यांकडून संघावर मात्र टीका करणे टाळले जात असे. पण बुधवारीनागपूरमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी अप्रत्यक्षपणे टीका केल्यामुळे शिवसेना भविष्यात संघाच्या धोरणांवरही टीका करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे संकेत मिळत आहेत.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वेळ पडल्यास भारतीय लष्करापेक्षा जलदगतीने सैन्य उभारणीकरू शकतो, असे म्हटले होते. रावते यांनी या पार्श्वभूमीवर भागवतांना उपरोधिक टोला लगावला. त्यांनी म्हटले की, पाकिस्तानची भीतीआता बाळगण्याची कोणतीही गरज नाही. तसेच सीमेवर लढण्यासाठी सैन्य भरतीची आणि सैनिकांना प्रशिक्षित करण्याची गरज नाही.फक्त एक शिट्टी मारायचा अवकाश की, सीमेवर लाखोंची फौज जमेल, असे रावते यांनी म्हटले. सीमेवर लढणारे सैनिक जीवाची पर्वा नकरता शत्रूशी लढतात. मोठ्या परिश्रमातून आणि मेहनतीतून सैन्य दलाची उभारणी करावी लागते, असे रावते यांनी सांगितले.