व्हीएस न्यूज – बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी आज पहाटे दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आली आहे. पुणे न्यायालयात डी. एस कुलकर्णी यांना हजर करण्यात येईल. न्यायालयाला डीएसकेंनी फसवले असल्याचे न्यायालयाने शुक्रवारीच म्हटले होते. तसेच अटकेपासूनचे संरक्षण काढून घेतले होते. डीएसकेंना त्यामुळेच कोणत्याही क्षणी अटक होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. ज्यानुसार ही कारवाई आज पहाटे करण्यात आली आहे.
ठेवीदारांची रक्कम परत करण्यासाठी डी. एस. कुलकर्णी यांनी वेळोवेळी उच्च न्यायालयाकडून मुदत घेतली होती. त्यामुळे त्यांना गेले काही महिने अटकेपासून संरक्षण मिळत होते. अखेर कुलकर्णी यांना देण्यात आलेले अटकेपासूनचे संरक्षण शुक्रवारी उच्च न्यायालयाकडून काढून घेण्यात आले आणि कुलकर्णी यांना अटक करण्याचा मार्ग मोकळा झाला. अखेर डी. एस. कुलकर्णी यांना आज पहाटे दिल्लीतून पुणे पोलिसांनी अटक करण्यात आली.
याआधीच न्यायालयाने एकवेळ भीक मागावी पण डीएसकेंनी लोकांचे पैसे उभे करावेत असे म्हणत डीएसकेंना फटकारले होते. तसेच डीएसके लोकांचे पैसे बुडवून सुखाने झोपतात असे म्हणतही न्यायालयाने डीएसकेंना झापले होते. तसेच शुक्रवारी न्यायालयाने त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा विश्वास उरला नाही असे म्हणत कारवाईसाठी तयार राहण्याचा इशाराच दिला होता. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002