व्हीएस न्यूज – सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी पत्रकारांशी बोलताना मराठी भाषेच्या वापरासाठी आग्रह जरूर असला पाहिजे, पण मराठीच्या वापराची सक्ती करता येणार नसल्यामुळे राज्य शासनाचा आग्रह करून मराठीचा वापर वाढवण्यावर भर राहणार असल्याचे सांगितले.
राज्य शासनाने माहिती तंत्रज्ञान, सरकारी कार्यालय आणि विज्ञान विषयक संशोधन या क्षेत्रातील मराठी भाषेच्या वापराची सद्य:स्थिती या विषयावर श्वेतपत्रिका प्रकाशित करावी, अशी मागणी बडोदा येथे सुरू असलेल्या साहित्य संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात करण्यात येणार असून तावडे यांना त्या संदर्भात विचारले असता ही भूमिका त्यांनी स्पष्ट केली. केंद्र सरकारच्या अखत्यारीत भाषेच्या अभिजात गरजेचा मुद्दा असून, लवकरच त्या संदर्भात निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्य शासनाने किमान एक कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य साहित्य संमेलनासाठी करावे आणि अर्थसंकल्पात या रकमेची तरतूद करावी, अशी मागणी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी वारंवार केली होती. तावडे यांचे त्याकडे लक्ष वेधले असता त्यांनी, साहित्य संमेलनासाठी तरतूद वाढविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आणि त्याविषयी अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी पुढाकार घेऊ, असेही स्पष्ट केले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002