एकाच वेळी 149 कॉपीराईट नोंदणीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद
व्हीएस न्यूज - विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग-व्यवसाय उभे करून नोकरीच्या संधी उपलब्ध कराव्यात. उद्योजक होण्यासाठी निरंतर अभ्यास, मोठी स्वप्न बघा, कार्याचा ध्यास घ्या, सात्विकता, सृजनशीलता वाढवावी, आपण हाती घेतलेल्या कार्यास कठोर परिश्रमाची जोड द्या, याबरोबरच सामाजिकभान असणे हे सुध्दा आवश्यक असून, या बाबींची जीवनात अंमलबजावणी केली तर हमखास यश मिळेल. पीसीसीओईआरने नाविन्यपूर्ण कल्पना तसेच सृजनशीलता सिध्द केल्यामुळेच कॉपीराईट नोंदणीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेतली, असे प्रतिपादन क्वालिटी इंजिनिअरिंगचे संचालक दिगंबर सुतार यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन केंद्र (पीसीसीओईआर) येथे 12 जानेवारी 2018 रोजी एकाच वेळी 149 कॉपीराईटची नोंदणी करण्यात आली. या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली. त्यानिमित्त पीसीसीओईआर महाविद्यालयास प्रमाणपत्र प्रदान केले. प्राचार्य डॉ. हरिष तिवारी आणि त्यांच्या सहकारी प्राध्यापकांचा वल्ड रेकॉर्ड इंडियाचे चिफ एडिटर पवन सोळंकी यांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले. त्यावेळी सुतार बोलत होते. यावेळी एमसीइडीचे कार्यक्रम संचालक हेमंत भागवत, पीसीईटीचे ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट सेलचे डीन प्रा. शितलकुमार रवंदळे, संयोजिका प्रा. अर्चना चौगुले, प्रा. किरण नापते, प्रा. सुदर्शन बोबडे, प्रा. निलेश कोरडे, प्रा. स्नेहा पावरे, प्रा. मयुरा येवले, प्रा. सोनाली कणसे, प्रा. श्याम मानकर, प्रा. महेंद्र साळुंखे, प्रा. चंदशेखर भावसार, प्रा. विजयलक्ष्मी कुंभार, प्रा. रुपाली सोनवणे, प्रा. मिनल बोडके, प्रा. स्मिता लांडगे आदी उपस्थित होते. यावेळी आंत्रप्रेनरशीप अवेरनेस कॅम्पचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना हेमंत भागवत म्हणाले की, जागतिक पातळीवरील पेटंट घेणारांची संख्या विचारात घेता भारतामध्ये हे प्रमाण खूप कमी आहे. पीसीसीओईआरने देशातील महाविद्यलयांपुढे नवा आदर्श घालून दिला आहे. पीसीसीओईआर विद्यार्थ्यांची सृजनशीलता, नाविन्यपूर्ण कल्पना यांना उभारी देण्याचे कार्य करत आहे, याबद्दल विशेष कौतुक केले. प्राचार्य डॉ. हरिष तिवारी यांनी कॉपीराईट नोंदणी करण्यामागील भूमिका विषद केली. तसेच पीसीसीओईआरने आतापर्यंत 190 पेटंटची नोंदणी केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कॉपीराईट नोंदणी कार्यक्रमाच्या संयोजिका प्रा. अर्चना चौगुले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या आयोजनास पीसीईटीचे अध्यक्ष माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, सचिव व्ही. एस. काळभोर, शांताराम गराडे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, विश्वस्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते दिपप्रज्वल करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. मानसी कुरकुरे, आभार किरण नापटे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विविध विभागाचे प्रमुख, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002