वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची किल्ले शिवनेरीवर ‘ओली’ पार्टी
पुणे
2018-02-19
व्हीएस न्यूज - छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या किल्ल्यावर झाला, त्याच किल्ल्यावर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दारूपार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या मद्यधुंद वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दारुसह काही शिवप्रेमींनी रंगेहात पकडले आणि त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी या कर्मचाऱ्यांना रात्री अटक करुन जामिनावर त्यांची सुटकाही केली. हा धक्कादायक शिवजयंतीच्या पुर्वसंध्येलाच प्रकार उघडकीस आल्याने शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. मोठ्या प्रमाणात काही पर्यटक गडकिल्ल्यांवर सोबत दारू घेऊन जात असल्याच्या तक्रारी आहेत, मात्र येथे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनीच दारू प्यायला सुरूवात केली आहे.