व्हीएस न्यूज – मुंबई ते पुणेदरम्यान जगातील पहिली हायपरलूप धावणार असून दोन्ही शहरांतील १५० किमीचे अंतर तसे झाल्यास फक्त १४ ते २५ मिनिटांत कापले जाईल. हे अंतर गाठण्यासाठी सध्या तीन तास लागतात. रविवारी मुंबई-पुणे हायपरलूप ट्रान्सपोर्टेशन सिस्टिमला जोडण्याच्या करारावर व्हर्जिन ग्रुप आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने स्वाक्षऱ्या झाल्या.
पहिला हायपरलूप रूट सेंट्रल पुणे यास मेगा पोलिसासोबत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास जोडण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याची कोनशिला रविवारी बसवण्यात आली. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गास समांतर हा मार्ग होऊ शकतो.
मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेदरम्यान व्हर्जिन ग्रुपचे चेअरमन रिचर्ड ब्रेनसन यांनी म्हटले, महाराष्ट्र सरकारसोबत करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. हायपरलूप रूट इलेक्ट्रिक यंत्रणा आहे. कंपनीचा दावा आहे की, या तंत्राने १ हजार किलोमीटर ताशी वेगाने प्रवास करणे शक्य आहे. यापूर्वी आंध्रप्रदेश सरकारने विजयवाडा व अमरावती ही शहरे हायपरलूपने जोडण्यासाठीअमेरिकन कंपनीशी करार केला आहे.