पंतप्रधान देशसेवा करत आहेत. ज्याला भुंकायचंय त्याने भुंकावे, असे या खासदाराने म्हटले.
‘रॉबर्ट वड्रा सरकारच्या निशाण्यावर
व्हीएस न्यूज - पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यावरून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत असलेल्या काँग्रेसवर भाजपा खासदाराने पलटवार केला आहे. घोटाळ्यावर बोलण्याचा काँग्रेसला अधिकार नाही. कारण हे सर्व त्यांच्याच सरकारच्या कालावधीत सुरू झाले आहे, असा आरोप भाजपा खासदार बृजभूषण शरण यांनी ‘एएनआय’शी बोलताना केला. राहुल गांधींना यावर बोलण्याचा अधिकार नाही. कारण त्यांच्या काळातच हे सुरू झाले होते. सरकारने आता कारवाई सुरू केली आहे. आता हा घोटाळा उजेडात आला आहे. त्यानंतर रॉबर्ट वड्राही पकडले जातील. कदाचित त्यांची आई (सोनिया) किंवा ते स्वत:ही यात फसू शकतात. मग ते ओरडतील, असे म्हणत राहुल गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषेचा वापरही केला. कुत्रे भुंकत असतात आणि हत्ती आपली मस्त चाल चालत असतो. पंतप्रधान देशसेवा करत आहेत. ज्याला भुंकायचंय त्याने भुंकावे, अशा शब्दांत त्यांनी राहुल गांधींवर टीका केली.
तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी पीएनबी घोटाळ्यातील नीरव मोदीकडे पंतप्रधानांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप केला होता. इतका मोठा घोटाळा का आणि कसा झाला आणि अशा घोटाळ्याप्रकरणी ते काय करत आहेत, हे मोदींनी सांगायला हवे, असा जाब राहुल यांनी विचारला होता. राहुल यांनी माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांचा हवाला देत एवढा मोठा घोटाळा वरून संरक्षण असल्याशिवाय होत नसल्याचे म्हटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुलांना दोन तासांत परीक्षेचा अभ्यास कसा करायचा सांगतात. पण ते या घोटाळ्यावर दोन मिनिटही बोलत नसल्याचे त्यांनी पक्षाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना म्हटले होते. ज्यावेळी पंतप्रधानांनी ५०० आणि एक हजार रूपयांच्या नोटा बाद ठरवत संपूर्ण देशाचा पैसा बँकिंग प्रणालीत आणला होता. त्याचवेळी म्हणजे ८ नोव्हेंबर २०१६ रोजी या घोटाळ्याची सुरूवात झाली होती, असा दावा राहुल गांधी यांनी केला होता.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002