व्हिएसन्यूज – दक्षिण भारताच्या राजकारणातील बहुप्रतिक्षित कमल हसन यांच्या ‘मक्कल नीधी मैय्यम’ पक्षाची घोषणा झाली आहे. कमल हसन यांनी यावेळी बोलताना सांगितले की, सध्याच्या राजकीय व्यवस्थेसाठी आपण एक उदाहरण असायला हवे आणि तुम्हाला मी भाषणे देण्याऐवजी तुमच्या मी सूचना घेईल. कमल हसन यांच्यासोबत यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि ‘आप’चे तामिळनाडूचे प्रभारी सोमनाथ भारती हे देखील उपस्थित होते. लोकांना न्याय मिळवून देणारे विचारपीठ असा ‘मक्कल नीधी’याचा अर्थ असून तिसऱ्या शब्दाचा अर्थ केंद्र (मध्य) असा होतो. कमल हसन यांनी यातून स्पष्ट केले आहे की, आपण उजवीकडेही राहणार नाही आणि डावीकडे राहणार नाही. आपण मध्यावर म्हणजेच केंद्रस्थानी असणार आहे.