महाराष्ट्र काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नाना पटोलेंची नियुक्ती
नवी दिल्ली
2018-02-24
व्हीएस न्यूज - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या उपाध्यक्षपदी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी खासदार नाना पटोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या महासचिवपदी भाई नागराळे यांची नियुक्ती झाली आहे. नाना पटोले व भाई नागराळे यांच्या नावाला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी मान्यता दिली. काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती झाल्याने विदर्भात काँग्रेसला नवे नेतृत्व मिळू शकते. यामुळे पटोले यांचे काँग्रेसमध्ये वजन वाढणार आहे.